
रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावर आधारित झी मराठीवरील 'उंच माझा झोका हा कार्यक्रम खूप गाजला. या मालिकेने प्रेक्षकांना रमाबाई रानडे यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष दाखवला. तो ऐतिहासिक काळ आणि तेव्हाचं जीवन प्रेक्षकांना भावलं. या मालिकेचं शीर्षक गीत आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या मालिकेत रमाबाई रानडे यांची भूमिका साकारणारी चिमुकलीदेखील तेव्हा प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता ती चिमुकली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालीये.