
मुंबईसह अनेक ठिकाणी अपघातांची संख्या वाढत असताना लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि महेश कोठारे यांची सून उर्मिला कानेटकर हिच्या गाडीचाही मोठा अपघात झालाय. मुंबईतील कांदिवली येथे ही घटना घडली असून तिच्या गाडीने दोन व्यक्तींना उडवलं आहे. या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला इस्पितळात दाखल करण्यात आलंय. तर या अपघातात अभिनेत्रीचा ड्रायव्हर आणि उर्मिला दोघेही जखमी आहेत.