
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. कांदिवलीहून शूटिंगवरून परत घरी जात असताना पोईसर या मेट्रो स्टेशनजवळ तिच्या गाडीला अपघात झाला होता. मेट्रो स्थानकाचं काम करणाऱ्या मजुरांना तिच्या गाडीने धडक दिली होती. त्यात एका मजुराचा मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी होता. या अपघातात उर्मिलाला आणि तिच्या ड्रायव्हरला देखील दुखापत झाली होती. आता त्या घटनेतून उर्मिला हळूहळू सावरतेय. तिने त्या घटनेनंतर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ती व्यायाम करताना दिसतेय.