

urmila kothare daughter jija
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिच्या 'काकण' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. आजही तिला पाहिल्यावर प्रेक्षकांना 'काकण' हा चित्रपट आठवतो. तिने 'दुनियादारी' , 'गुरू', 'ती सध्या काय करते', 'एकदा काय झालं', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'अनवट', 'मला आई व्हायचंय' अशा अनेक सिनेमात काम केलंय. त्यासोबतच ती अनेक मालिकांमध्येही दिसली. उर्मिला उत्कृष्ट नृत्यांगना आहे. उर्मिलाप्रमाणे तिची मुलगी जिजा कोठारेदेखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आज बालदिनानिमित्त उर्मिलाने जिजासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होतायत.