
२०२४ च्या शेवटी २८ डिसेंबर रोजी लोकप्रिय मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. उर्मिलाच्या ड्रायव्हरने भरधाव गाडी चालवत दोन मजुरांना उडवलं होतं. कांदिवली येथे मेट्रोचं काम करणाऱ्या या मजुरांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर एक गंभीर जखमी झालेला. या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरदेखील जखमी झाले होते. आता या अपघातासंबंधित काही गोष्टींचा छडा लावण्यासाठी अभिनेत्रीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.