
पुणे : आपल्या दमदार आवाज, खास अंदाज आणि गाण्याच्या अनोख्या शैलीमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या प्रख्यात गायिका उषा उत्थुप आता पुणेकरांसमोर थेट सादर होणार आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’ तर्फे १९ एप्रिल रोजी ‘उषा उत्थुप – लाइव्ह इन कॉन्सर्ट’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही भव्य संगीतमय संध्या सायंकाळी ६.३० वाजता, कर्वेनगर येथील डीपी रोडवरील महालक्ष्मी लॉन्सवर रंगणार आहे. भारतीय पॉप संगीताच्या सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उषा उत्थुप यांनी आपल्या विशेष गानशैलीने चित्रपट, लाईव्ह शोज आणि संगीतविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.