

वाह उस्ताद म्हणत सगळ्यात मनावर आपल्या तबल्याची छाप पाडणारे उस्ताद झाकीर हुसेन यांनी काळ १५ डिसेंबर २०२४ रोजी या जगाचा निरोप घेतला. रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सॅन फ्रॅन्सिस्को येथील इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रात्री उशिरा त्यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी याबद्दल सांगितलं. त्यानंतर संपूर्ण कलाक्षेत्रावर शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचा एक जुना फोटो व्हायरल होतोय ज्यात झाकीर हे मित्राच्या चितेजवळ उभे दिसतायत.