
Marathi News : बंगळूर येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल पॅनोरमा फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद क्षण होता. "ऊत - भावनांचा उद्रेक" या सशक्त मराठी चित्रपटाला या महोत्सवात मानाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित राहिलेले अभिनेते राज मिसाळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून उपस्थितांना चकित केले.