

actor leaves star pravah serial
esakal
Vachan Dile Tu Mala Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'वचन दिले तू मला' मध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. या मालिकेत ऊर्जा आणि शौर्य यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. त्याची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. अशातच आता मालिकेतील एका अभिनेत्याने मालिकेचा निरोप घेतलाय. मालिकेत नुकताच विक्रांत शिर्केचा खून झालाय आणि तो ऊर्जाने केलाय. त्यामुळे आता विक्रांतचं पात्र यापुढे मालिकेत दिसणार नाही. त्याने मालिकेचा निरोप घेतलाय. यासाठी अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केलीये.