

SAII RANADE
ESAKAL
मराठी मालिकांमधील अनेक कलाकार हे हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसतात, मानसी साळवी, निशिगंधा वाड, पुर्वा गोखले, मुग्धा शाह यांसारख्या अभिनेत्री हिंदी मालिका गाजवतायत. अनेक अभिनेतेदेखील हिंदी मालिकेसाठी प्रयत्न करताना दिसतात. तिथे पैसे चांगले मिळतात हे अनेक कलाकारांनी आधीच सांगितलंय. मात्र आता एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने तिचा हिंदी मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगितलाय. मराठीपेक्षा हिंदी मालिकेच्या सेटवर मराठी कलाकारांना मानाची वागणूक मिळते असं ती म्हणालीये.