
vallarI viraj
esakal
छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यातील काही प्रेक्षकांच्या विस्मरणात जातात तर काही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. त्यातलीच एक गाजलेली मालिका म्हणजे झी मराठीची 'नवरी मिळे हिटलरला'. या मालिकेत अभिनेता राकेश बापट, अभिनेत्री वल्लरी विराज यांच्या मुख्य भूमिका होत्या. मालिकेतील वल्लरी म्हणजेच लीला घराघरात लोकप्रिय ठरली. तिच्या चुलबुली स्वभावाने प्रेक्षकांना वेड लावलं. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अवघ्या वर्षभरात ही मालिका बंद झाली. प्रेक्षकांची आवडती असूनही वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा ही गोष्ट कलाकारांना समजली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वल्लरीने तिची काय अवस्था झाली होती याबद्दल सांगितलंय.