
लोकप्रिय मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. वर्षा यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, नाना पाटेकर अशा अनेक कलाकारांसोबत त्या झळकल्या. मात्र त्यांना ड्रीम गर्ल ही पदवी मराठी प्रेक्षकांनी दिली. बिनधास्त आणि अभिनेत्यांच्या तोडीस तोड ठरलेली स्त्री सुपरस्टार होत्या वर्षा. मात्र त्यांच्या चित्रपटांइतकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिलं. वर्षा यांच्या सासऱ्यांनी त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीमधून बेदखल केलं होतं.