

varsha usgaonkar on akshay kumar
esakal
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ऋषी कपूर, अक्षय कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी अक्षय कुमारसोबत काम करतानाचा एक खास किस्सा सांगितला. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हत्या’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला हा प्रसंग आहे. विशेष म्हणजे, आपल्या फिटनेस आणि शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारची त्यावेळी चांगलीच फजिती झाली होती!