
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा वाढत चाललेला आहे. कित्येक दाक्षिणात्य चित्रपट डब किंवा रिमेक करून हिंदीमध्ये प्रदर्शित केले जात आहेत आणि ते चांगला व्यवसाय करीत आहेत. आता प्रदर्शित झालेला बेबी जाॅन हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांचा सन २०१६ मध्ये आलेल्या थेरी या तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे. तमीळ भाषेतील या चित्रपटामध्ये थलपती विजयने काम केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली होती. आता त्याच्याच हिंदी रिमेकमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनने काम केले आहे. या चित्रपटामध्ये मनोरंजनाचा पुरेपूर मसाला भरण्यात आला आहे. दिग्दर्शक कॅलिस यांनी थरारक अॅक्शन, रोमान्स याबरोबरच भावभावनांचे सुरेख चित्रण केले आहे.