Riteish- Jenelia: एकच मन आहे, किती वेळा जिंकाल! रितेश- जिनिलियाचा मोठा निर्णय, होतोय कौतुकाचा वर्षाव

Riteish Deshmukh Jenelia D'souza Big Decision to Donate Organs: लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर चर्चेत आहे.
riteish Deshmukh
riteish Deshmukhsakal

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुझा. ही जोडी कायमच प्रेक्षकांची आवडती राहिली आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच त्यांच्या वागण्यामुळे आणि चांगल्या स्वभावामुळे त्यांच्यावर कायमच कौतुकाचा वर्षाव होत असतो. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत असतात. अशातच ते दोघे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्याची चाहत्यांमध्येही चर्चा आहे.

रितेश आणि जिनिलिया नेहमीच त्यांच्या कामातून चाहत्यांसमोर एक वेगळा आदर्श घालून देत असतात. आताही त्यांनी एक मोठा निर्णय घेत एक नवा पायंडा ठेवला आहे. रितेश आणि जिनिलिया यांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ऑर्गन डोनेशन महिना सुरू आहे. त्यानिमित्ताने एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी हा निर्णय चाहत्यांना सांगितला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश म्हणतो, 'नमस्कार, मी आणि जिनिलियाने याबद्दल खूपदा विचार केला, खूप चर्चा केली पण आजवर कधी सांगू नाही शकतो. आज १ जुलै रोजी आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही दोघांनीही एक प्रतिज्ञा केली आहे. आम्ही आमचे अवयव दान करण्याची प्रतिज्ञा केली आहे.'

riteish Deshmukh
Mi Honar Superstar Winner: सख्खे भाऊ ठरले 'मी होणार सुपरस्टार जोडी नं १'चे विजेते; बक्षीस म्हणून मिळाले 'इतके' लाख रुपये

त्यानंतर जिनिलिया म्हणते, 'हो आम्ही आमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी दुसऱ्यांना जीवन देण्याइतकी मोठी गोष्ट नाही. त्यामुळे आम्ही तुम्हालाही आवाहन करतो की तुम्हालाही असं दान करायचं असेल तर दुसऱ्यांदा विचार करू नका. तुम्हीही ही प्रतिज्ञा घ्या.' त्यांच्या या व्हिडिओवर चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. रितेश लवकरच 'ककुदा' या चित्रपटात दिसणार आहे. सोबतच त्याची 'पिल' ही वेबसीरीजही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com