
अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने दिली माहिती
'वेड' चा पुढचा भाग येणार
नेमकं काय म्हणाली अभिनेत्री
'वेड २' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला. हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. चार- चार वेड चित्रपट पाहणारे प्रेक्षकही आपल्याला दिसतात. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाने खऱ्या अर्थाने सगळ्यांना वेड लावलेलं. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. तर जिनिलिया देशमुख हिने मराठी चित्रपटात पदार्पण केलेलं. २०२३ सालच्या या चित्रपटाचा पुढचा भाग कधी येणार याची प्रेक्षकांकडून कायम विचारणा होत होती. आता अखेर जिनिलियाने एका मुलाखतीत याचा खुलासा केलाय.