
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान चर्चेत आहे
याचे कारण आहे तिची नवी मालिका 'विण दोघातली ही तुटेना'
लग्न करताना कसा जोडीदार हवा? 'मराठी की अमराठी'...तेजश्री प्रधानने उत्तर दिले आहे
Tejashree Pradhan Marriage Thoughts : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘हॅशटॅग तदैव लग्नम’ सिनेमातून आणि अनेक मराठी मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारी तेजश्री ३६व्या वर्षीही अविवाहित आहे. २०१५ मध्ये वयाच्या २६व्या वर्षी तिचा घटस्फोट झाला. पुन्हा लग्नाचा विचार करताना तिने ‘मुक्कामपोस्ट मनोरंजन’ला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणाने अनेक प्रश्नांची उत्तर दिली होती. आता तिची नवी मालिका 'विण दोघातली ही तुटेना' सुरू झाल्यापासून हा इंटरव्ह्यु पुन्हा व्हायरल होत आहे