dharmendra hospitalised
esakal
Premier
Dharmendra Hospitalised: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र इस्पितळात दाखल; अचानक तब्येत बिघडल्याने चाहते चिंतेत
Veteran Bollywood Actor Dharmendra Hospitalised: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. ते सध्या ८९ वर्षांचे आहेत.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना नुकतंच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ३१ ऑक्टोबर रोजी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना ब्रीज कँडी इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काळजीचं कोणतंही कारण नाही. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. वयाचा विचार करून, केवळ खबरदारी म्हणून त्यांना तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. इस्पितळात नेण्यापूर्वी धर्मेंद्र हे त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या प्रमोशनमध्ये सहभागी झाले होते.

