
मराठी सिनेविश्वातून एक मोठी बातमी समोर येतेय. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ लोकप्रिय अभिनेते विवेक लागू यांचं निधन झालंय. त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केलंय. त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आज १९ जून रोजी सायंकाळी ६. ३० वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिव देहावर २० जून रोजी सकाळी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार होणार आहेत.