

daya dongare death
esakal
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये एक खास स्थान निर्माण केले होते. विशेषतः दूरदर्शनवर गाजलेल्या 'गजरा' मालिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्या ८५ वर्षाच्या होत्या.