
‘आग का गोला’, ‘आँखे’, ‘आग ही आग’, ‘पाप की दुनिया’, ‘ज्युली २’, ‘रंगीला राजा’ अशा चित्रपटांची निर्मिती करणारे पहलाज निहलानी यांची एक मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय. यात त्यांनी अनिल कपूर यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. चित्रपट निर्माते ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (CBFC)चे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी बोनी कपूर आणि त्यांची गँग यांनी माधुरी दीक्षितला कसं फसवलं याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. सध्या त्यांच्या वक्तव्यांची चर्चा होताना दिसत आहे. अनिल कपूर यांनी एका मुलाखतीत ‘अंदाज’ चित्रपटाला बी ग्रेड चित्रपट म्हटलं होतं. यावर त्यांनी भाष्य केलंय.