
Marathi Celebrity Interview : रंगभूमीबरोबरच टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये मी काम केले असले तरी माझी सगळ्यामध्ये आवडती भूमिका आहे ती ‘रातराणी’ या नाटकातील. १९८८ साली हे नाटक आले होते. कुमार सोहोनी या नाटकाचे दिग्दर्शक होते तर प्र. ल. मयेकर यांनी ते लिहिलेले होते. भक्ती बर्वे आणि माझी या नाटकामध्ये प्रमुख भूमिका होती. भक्ती बर्वेने या नाटकामध्ये ॲना स्मिथ ही भूमिका साकारली होती.
माझ्या व्यक्तिरेखेचे नाव सॅली. खूप घाबरविणारी अशी ती भूमिका होती. अत्यंत अजागळ असा तो माणूस होता. दाढी आणि केस वाढलेले. फाटका कोट, फाटका शर्ट आणि पँट व फाटलेले बूट. त्याला बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला भीती वाटायची. त्या भूमिकेमुळे अख्खं थिएटर घाबरायचं.