
Bollywood News: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन अनेकांची लाडकी आहे. विद्याने इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी प्रचंड स्ट्रगल केलाय. तिने केलेला प्रत्येक सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 'द डर्टी पिक्चर', भूलभुलैया', 'परिणीता' असे अनेक चित्रपट तिने गाजवलेत. विद्याच्या अभिनयाला तोड नाही. तिचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग आहे. सध्या विद्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे विद्याने शेअर केलेला खास व्हिडीओ. या व्हिडिओमध्ये विद्या 'खंडेरायाच्या लग्नाला' या गाण्यावर नाचताना दिसतेय.