बॉलीवूड मधील आघाडीची अभिनेत्री म्हणून विद्या बालनचे नाव घेतले जाते. आज म्हणजेच १ जानेवारीला विद्या बालन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. विद्या बालनचा जन्म १ जानेवारी १९७९ रोजी मुंबईत झाला..विद्याने तिच्या करिअरची सुरुवात दूरदर्शनवरील मालिकांमधून केली. परंतु तिला खरी ओळख मिळाली ती परिणीती मधून. ललिताची भूमिका साकारून तिने स्वतःला एक दमदार अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं. त्यानंतर तिने मात्र मागे वळून पाहिलें नाही. तिने तिच्या करिअर मध्ये अनेक उत्तमौत्तम सुपरहिट चित्रपट दिले. विद्याने ‘डर्टी पिक्चर’, ‘कहानी’, ‘तुम्हारी सुलू’, ‘मिशन मंगल’, ‘शेरनी’ यांसारख्या चित्रपटांतून विविधरंगी भूमिका केल्या व प्रेक्षकांना आपले वेगळेपण दाखवून दिले.. मसाला खिचडी आणि... मलायका अरोराच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतोय 'हा' मराठमोळा पदार्थ; किंमत वाचून म्हणाल बाप रे .विद्या बालन तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असते. एका मुलाखतीत तिने तिच्या पहिल्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना सांगितलं की तिचा पहिला बॉयफ्रेंड तिची फसवणूक करत होता. ती म्हणाली, “तो एकदम वाईट होता. मी त्याच्यासोबत ब्रेकअप केलं होतं, पण व्हॅलेंटाईनच्या दिवशी तो मला कॉलेजमध्ये भेटला आणि म्हणाला, ‘मी माझ्या एक्स-गर्लफ्रेंडला भेटायला चाललो आहे.’ यामुळे मला खूप दुःख झालं, पण आज मी माझ्यासाठी चांगलं आयुष्य उभं केलं आहे.” विद्या सध्या निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. .विद्या बालन ने बॉलिवूडमध्ये पारंपरिक नायिकेची प्रतिमा मोडली. ‘द डर्टी पिक्चर’मधील भूमिका निवडताना तिला टीकेला सामोरं जावं लागलं. मात्र तरीदेखील , न डगमगता तिने हि भूमिका उत्तम पद्द्तीने पार पडली. .Anurag Kashyap : "मी मुंबई सोडतोय" अनुराग कश्यपने जाहीर केला निर्णय ; कारण सांगत म्हणाला... .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.