भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्ट मॅचनंतर मोठं पाऊल उचलले. खराब खेळी लक्षात घेतला रोहितने स्वत:ला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवले. त्याच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर खूप चर्चा रंगल्या होत्या. बॉलीवूडमधील कलाकारांनी देखील रोहितच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु या सगळ्यामध्ये विद्या बालन हिचा पोस्ट चर्चेचा विषय ठरली. लोकांनी तिला तिच्या पोस्टवरून चांगलंच ट्रोल केले.