

VIJAY PATKAR ON LAXMIKANT BERDE
ESAKAL
आपल्या अभिनयाने आणि विनोदाच्या उत्तम टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. केवळ मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं. त्यांनी 'लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल, वर्षा उसगावकर, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केलीये. त्यांच्या अनेक आठवणी ते अनेकदा प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसतात. दिग्गज दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत यांनी अनेकांना मदत केलीये. त्यांनी मराठी कलाकारांना आपलं मानलं. अशातच विजय यांनी लक्ष्मीकांत यांची अशीच एक आठवण सांगितलीये. त्याने आम्हाला पोसलंय असं ते म्हणालेत.