
Bollywood News : चित्रपटांबरोबरच वेबसिरीज आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता विक्रांत मेस्सी. त्याने आपल्या प्रत्येक भूमिकेमध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे. ‘१२वी फेल’सारख्या गाजलेल्या चित्रपटातून त्याने फक्त अभिनय कौशल्यच नव्हे तर प्रेक्षकांचा विश्वासही मिळविला. या चित्रपटातील त्याच्या कामाचे कौतुकही झाले.