
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसी याने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 'द साबरमती रिपोर्ट' नंतर त्याने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा तो मोठ्या पडद्यावर परतला आहे. या पावसाळ्यात 'आंखों की गुस्ताखियां' एक गोड प्रेमकथा घेऊन येत आहे, ज्यात विक्रांत मॅसी आणि शनाया कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्या पोस्टरनंतर आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, तो प्रेम, भावना आणि सुंदर क्षणांनी भरलेला आहे.