
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी याने टीव्ही ते मोठा पडदा असा प्रवास स्वकष्टावर केला आहे. या प्रवासात त्याने बऱ्याच खचता खाल्ल्यात. पडद्यावरील प्रत्येक पात्र त्याने जिवंत केलं. '१२थ फेल' हा त्याचा चित्रपट प्रचंड गाजला. याशिवाय त्याच्या 'हसीन दिलरुबा' चित्रपटाला देखील प्रचंड यश मिळालं. मात्र त्यानंतर त्याने अचानक अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला असल्याचं त्याने सांगितलं. आता विक्रांतने पहिल्यांदाच त्याच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.