
'१२थ फेल' , 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेस्सी याने सोमवारी सकाळी केलेल्या एका पोस्टने संपूर्ण सोशल मीडिया हादरलं होतं. आपण बॉलिवूड सोडत असून २०२५ मध्ये येणारे दोन चित्रपट आपले शेवटचे चित्रपट असतील असं त्याने लिहिलं होतं. त्यानंतर मी माझ्या कुटुंबाकडे पार्टनर असून एक बाप, पती आणि मुलगा म्हणून घरातल्यांना वेळ देणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी विक्रांतने घेतलेल्या इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयाने सगळेच चकीत झाले होते. मात्र आता त्याने आपण रिटायर होत नसल्याचं सांगितलं आहे.