
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या नव्या मालिकेमुळे चर्चेत आहे
'विण दोघातली ही तुटेना' मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे
पण घटस्फोटानंतर लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल तेजश्री काय म्हणाली, जाणून घ्या
Tejashree Pradhan Marriage and Divorce : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. ‘लोकमत फिल्मी’शी बोलताना तेजश्रीने सध्याच्या तरुणाईत वाढत्या लिव्हइन ट्रेंडवर भाष्य केलं आणि लग्नाच्या महत्त्वावर जोर दिला.