
vishakha subhedar
esakal
आपल्या विनोदी शैलीने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. एका हळव्या, प्रेमळ आईच्या भूमिकेत ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वेल डन आई’ असे त्या चित्रपटाचे नाव आहे. शंकर अर्चना बापू धुळगुडे दिग्दर्शित हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. याची कथा-पटकथा शंकर अर्चना बापू धुळगुडे आणि संदीप गचांडे यांनी लिहिली आहे. दीपाली प्राॅडक्शन या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती सुधीर पाटील यांनी केली आहे. विशाखा यांच्यासह विजय निकम आणि जयवंत वाडकर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने विशाखा सुभेदार हिच्याशी साधलेला खास संवाद.