

vishal nikam
esakal
''बिग बॉस मराठी ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता विशाल निकम प्रेक्षकांचा आवडता आहे. त्याने 'बिग बॉस मराठी ३'ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. तो एक अभिनेता असण्यासोबतच मॉडेल आणि फिटनेस ट्रेनर देखील आहे. सांगलीतल्या या हिरोने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. विशाल कायमच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलाय. त्याने अनेकदा त्याच्या आयुष्यात एक सौंदर्या असल्याचं सांगितलं. त्याने तिच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले होते. मात्र त्याच्या सौंदर्याचा चेहरा कुणालाही दाखवला नव्हता. अखेर त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा प्रेक्षकांना दाखवलाय.