

vivek oberoi
ESAKAL
बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने त्याच्या करिअरच्या सुरूवातीला 'साथिया' या चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावलं होतं. इंडस्ट्रीला एक नवीन रोमॅंटिक हिरो मिळाला होता. मात्र हे चित्र फार काळ टिकलं नाही. त्याला त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला. एक वेळ तर अशी होती जेव्हा बॉलिवूडमधून तो हद्दपार झालेला. त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला. तब्बल १५ महिने त्याच्याकडे काम नव्हतं. मात्र या परिस्थितीतही त्याने हार मानली नाही किंवा पैशांसाठी कुणासमोर हात पसरले नाहीत. त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला.