

influensars who lost their baby
esakal
सोशल मीडियावर अनेक कपल व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांची जर्नी पाहायला सगळ्यांनाच आवडतं. कारण यात ते कपल त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट घटनाही सांगतात आणि फक्त आनंदच नाही तर दुःखातही चाहते त्यांची साथ देतात. अशाच एका लोकप्रिय इन्फ्लुएन्सर कपलने त्यांच्या फॉलोवर्सना वाईट बातमी दिलीये. त्यांनी त्यांचं बाळ गमावलंय. wanderingminds_india हे इंस्टाग्राम हॅण्डल चालवणारे सुशील अहिरे आणि किंजल दमानी यांनी त्यांच्या बाळाबद्दल आणि त्याच्या निधनाबद्दल पोस्ट करत सांगितलंय.