

pooja bhatt on nude photoshoot
esakal
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी ९० ची अभिनेत्री पूजा भट्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पूजाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. मात्र ती फार कमी चित्रपटांमध्ये दिसली. सिनेमांसोबतच ती तिच्या खाजगी आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत राहिली. तिच्या आयुष्यातील असंच एक गाजलेलं प्रकरण म्हणजे तिने केलेलं न्यूड फोटोशूट. हे फोटोशूट चांगलंच चर्चेत होतं कारण यात पूजाने कपडे घातले नव्हते. तिच्या संपूर्ण शरीरावर रंग देण्यात आला होता. आता या फोटोशूटबद्दल तिने मोठा खुलासा केलाय.