WELCOME TO THE JUNGLE
esakal
AKSHAY KUMAR'S WELCOME TO THE JUNGLE FULL MOVIE REVIEW: हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये धमाल, वेलकम, मस्ती अशा काही विनोदी चित्रपटांच्या फ्रॅचाईजींनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. त्यातील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक म्हणजे ‘वेलकम’. या चित्रपट मालिकेने गेल्या दोन दशकांत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ‘उदय शेट्टी’, ‘मजनू भाई’ आणि ‘घुंगरू शेठ’ यांसारखी पात्रे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.