
'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. टीआरपीमध्ये दोन वर्ष ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच मालिकेत निर्माते निरनिराळे ट्विस्ट आणताना दिसतात. आता मालिकेत विलास खून प्रकरण कोर्टात चालू आहे. त्यातही अर्जुन आता साक्षीचं खुनी आहे हे सिद्ध करण्याच्या खूप जवळ येऊन पोहोचलाय. अशात शेवटचे ३० दिवस या प्रोमोमुळे ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे आता साक्षीला दोषी सिद्ध केल्यानंतर मालिकेत नेमकं काय घडणार याबद्दल स्वतः अमित भानुशाली म्हणजेच अर्जुनने सांगितलं आहे.