

TEJASHREE PRADHAN real age
esakal
छोट्या पडद्यावरील टॉप ५ अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकांमध्ये सोज्वळ वेळेप्रसंगी खंबीर भूमिका करणारी तेजश्री खऱ्या आयुष्यातही तितकीच खंबीर आणि हळवी आहे. तिने आपल्या वागण्यानेदेखील चाहत्यांच्या मनात घर केलं. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांसोबत जोडलेली असते. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नाविषयी भाष्य केलं. ज्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. मात्र दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणारी तेजश्री किती वर्षांची आहे ठाऊक आहे का?