Swapnil Joshi: नवऱ्याला अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहून काय असते स्वप्नीलच्या बायकोची प्रतिक्रिया? प्रार्थनाने दिलं उत्तर

Parthana Behere Talked About Swapnil Joshi: लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याच्या बायकोची त्याच्या चित्रपटावर काय प्रतिक्रिया असते हे प्रार्थना बेहेरेने सांगितलं आहे.
swapnil joshi
swapnil joshi sakal

मराठी सिनेसृष्टीतील रोमँटिक अभिनेता म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजे स्वप्नील जोशी. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आपल्या चित्रपटातून त्याने चाहत्यांना प्रेमाचा नवा अर्थ शिकवला. त्याने अनेक हिट चित्रपटात काम केलं. स्वप्नील अनेकांचा लाडका अभिनेता आहे. तो त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. अनेक चित्रपटात तो रोमँटिक भूमिका करताना दिसतो. मात्र त्यावर त्याच्या पत्नीची काय प्रतिक्रिया असते? याबद्दल अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने उत्तर दिलं आहे.

स्वप्नील लवकरच 'बाई गं' या चित्रपटात सहा अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याने मित्र म्हणे लाइमलाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना प्रार्थना म्हणाली, 'एका मुलाखतीत स्वप्नीलला असा प्रश्न विचारला की अरे तू इतक्या सगळ्या बायकांसोबत असतोस नेहमी. चॉकलेट हिरो वगरे. नेहमीच असा असतो. तुझ्या लीनाला प्रॉब्लेम नाही का होत? त्यावर त्याने इतकं छान उत्तर दिलं ना. तो म्हणाला की इतके वर्ष ती मला हेच करताना बघत आलीये. आणि ती ते मला करू देतेय इथेच कळतं ना माझं माझ्या बायकोशी काय रिलेशन आहे. आणि इथेच कळलं ना मी तिचं मन जिंकलंय.'

पुढे ती म्हणाली, 'सो मला असं वाटतं याहून मोठं उदाहरण नाहीये. त्याला व्यवस्थित माहितीये की त्याला काय करायचंय. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तो कृष्ण होता. त्याला बायकांचं मनं खूप छान कळतं. प्रत्येक वेळेला कसं वागायचं हे त्याला बरोबर कळतं.' 'बाई गं' या चित्रपटात तो दीप्ती देवी, सुकन्या मोने ,अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड आणि नेहा खान यांच्यासोबत दिसणार आहे.

swapnil joshi
Actress Robbed In Europe: गाडीची काच फोडून कोट्यवधींचं सामान लंपास; पतीसह परदेशात अडकली अभिनेत्री, मायदेशी परतण्यासाठी मागतेय मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com