Chinmay Mandalekar: चिन्मय मांडलेकरने महाराजांची भूमिका सोडली तर शिवराज अष्टकाचे काय होणार? दिग्पालने थेटच सांगितले

या निर्णयामुळे सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटी आणि त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसलाय |This decision has come as a shock to the cine industry celebrities and their fans
 Chinmoy Mandlekar leaves the role of shivaji Maharaj Digpal lanjekar
Chinmoy Mandlekar leaves the role of shivaji Maharaj Digpal lanjekar sakal

Chinmay Mandalekar: सोशल मीडियावर मुलाच्या नावाने झालेल्या ट्रोलिंगमुळे अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत यापुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही असं जाहीर केलं. त्यांच्या या निर्णयामुळे सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटी आणि त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसलाय.

चिन्मय यांनी दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक चित्रपट मालिकेतील पाच सिनेमांमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे यापुढे या चित्रपटमालिकेतील राहिलेल्या सिनेमांमध्ये चिन्मय दिसणार कि नाही याबद्दल दिग्पाल यांनी एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. (digpal lanjekar)

 Chinmoy Mandlekar leaves the role of shivaji Maharaj Digpal lanjekar
Chinmay Mandlekar: "ट्रोलर्समुळे तुझ्या करिअरचे निर्णय बदलू नकोस"; चिन्मयच्या निर्णयावर अवधूत गुप्तेनी दिला सल्ला

दिग्पाल यांनी नुकतंच लोकमत फिल्मीला मुलाखत देताना या घटनेबाबत मत मांडलं. ते म्हणाले,"माझी अजून याबाबत चिन्मयशी चर्चा झाली नाहीये. आमचं जुजबी मेसेजच्या रुपात बोलणं झालं. पण, त्याने हा निर्णय घेण्याआधी आमची चर्चा झालेली नाही. आज (२२ एप्रिल) चर्चा होईल असं अपेक्षित आहे. 'शिवराज अष्टक' मालिकेत महाराजांची भूमिका अजूनतरी चिन्मयच करणार आहे.()

पण, आमची चर्चा झाल्यावर अंतिम जे काही आहे ते कळेल." तसंच यापुढे चिन्मय सिनेमात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार कि नाही या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले,"अनेक गोष्टींची मला कल्पना नाही. या सगळ्या गोष्टींवर शिवराज अष्टक अवलंबून आहे. कारण, शिवराज अष्टक मालिका केवळ सिनेमाचा भाग नसून तो लोकांच्या भावनेचा भाग आहे. प्रत्येकाला त्यात सहभागी व्हावं लागेल. चर्चा झाल्याशिवाय सध्या यावर मी काहीही बोलणं चुकीचं ठरेल."

 Chinmoy Mandlekar leaves the role of shivaji Maharaj Digpal lanjekar
Chinmay Mandlekar:"येड्याचा बाजार अन् खुळ्याचा शेजार"; मुलाच्या नावावरुन चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

दिग्पाल यांच्या प्रतिक्रियेमुळे चिन्मय निदान शिवराज अष्टक चित्रपट मालिकेत काम करतील अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत. चिन्मय यांनी आजवर शिवराज अष्टक मालिकेतील 'फर्जंद','फत्तेशिकस्त','पावनखिंड','शेर शिवराज','सुभेदार' या सिनेमांमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत चिन्मय यांनी ही भूमिका साकारणं सोडू नये अशी विनवणी केली आहे.

चिन्मय यांनी त्यांचा निर्णय जाहीर केल्यावर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांची नाराजी व्यक्त केली. अवधूत गुप्ते, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर, अदिती सारंगधर, रवी जाधव, सुहृद गोडबोले आणि ऋजुता देशमुख या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आणि चिन्मय यांनी असा निर्णय घेऊ नये म्हणून विनवणी केली.

 Chinmoy Mandlekar leaves the role of shivaji Maharaj Digpal lanjekar
Chinmay Mandlekar: "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून..."; मुलाच्या 'जहांगीर' या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगमुळे चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com