
छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. त्यात या मालिकांमधील कथा आणि त्यातले कलाकार सगळंच प्रेक्षकांच्या आवडीचं असतं. त्यातले कलाकारही त्यांना आपल्या घरातले सदस्यच वाटतात. हे सदस्य कधी मालिकेत दिसले नाहीत तर मात्र प्रेक्षकही बुचकळ्यात पडतात. असाच आता 'ठरलं तर मग' मालिकेच्या सेटवर आजाराची साथ पसरल्याचं चित्र आहे. मालिकेतील मुख्य अभिनेता अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली आजारी पडलाय.