
बॉलिवूडचा हिरो नं १ असणारा अभिनेता गोविंदा याने एकेकाळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांच्या विनोद करण्याच्या स्टाइलचे लाखो दिवाने होते. अजूनही गोविंदाची जादू कमी आलेली नाही. मात्र त्याचं वैयक्तिक आयुष्य इतकं सोपं नव्हतं. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या अभिनेत्याने स्वतःच्या आयुष्यात आपल्या बाळाला गमावल्याचं दुःख पचवलंय. एका कार्यक्रमात त्याने त्या प्रसंगाबद्दल सांगितलं जेव्हा आपल्या बाळाला घेऊन गोविंदा नर्मदा नदीत बुडवायला गेला होता.