

ramayan lav and kush
esakal
UNKNOWN FACTS ABOUT RAMAYANA: रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांची पात्रं घराघरात पुजली गेली, पण मालिकेच्या 'उत्तर कांड' भागातील लव आणि कुश या बालकलाकारांनीही प्रेक्षकांची मने जिंकली होती. सुरुवातीला रामानंद सागर यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलांची या भूमिकेसाठी निवड करण्याचा विचार केला होता, परंतु अखेर महाराष्ट्रातील दोन मुलं स्वप्निल जोशी (कुश) आणि मयूरेश क्षत्रमाडे (लव) यांची निवड करण्यात आली. पडद्यावर अतिशय निरागस दिसणारे हे दोन्ही कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूपच खोडकर होते, असं खुद्द रामानंद सागर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.