
सूरज बडजात्या यांनी त्यांच्या आगामी 'बडा नाम करेंगे' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावली. सुरज बडजात्या म्हटलं की आठवतो तो 'हम आपके हैं कौन हा चित्रपट. राजश्री प्रोडक्शन्सच्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता 'हम आपके है कौन...!' या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी पडद्यामागे घडलेला एक किस्सा सुरज यांनी या कार्यक्रमात सांगितला. जेव्हा माधुरी दीक्षितमुळे सलमान खानला नाइटी घालावी लागली होती.