
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचं फार जुनं कनेक्शन आहे. अंडरवर्ल्ड दोन दाउद इब्राहिम अनेक बॉलिवूड कलाकारांकडून खंडणीची मागणी करायचा. अनेक अभिनेत्रींना देखील तो त्रास द्यायचा. त्याच्याच गॅंगमधील एक होता अबू सलेम. अबू सलेम हा एका बॉलिवूड अभिनेत्रींसोबत रिलेशनमध्ये होता आणि ती अभिनेत्री होती मोनिका बेदी. मोनिकाचं आणि अबू सलेमचं नातं समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता. करिअरच्या टॉपवर असताना मोनिका त्याच्या प्रेमात पडली. मात्र त्याची किंमत तिला स्वतःचं करिअर आणि आयुष्य उध्वस्त करून फेडावी लागली. ती तुरुंगात गेल्यावर जेलरने तिचा व्हिडिओ देखील बनवला होता.