
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. विशेषतः बच्चेकंपनीला या चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभलेला. या चित्रपटातील सहजभाव आणि कथा प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटात दोन छोट्याश्या कलाकारांनी सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. कीर्तन सांगणारा ज्ञानेश आणि त्याची लहानगी अवखळ बहीण मुक्ता यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. मात्र सध्या ही चिमुकली मुक्ता काय करते तुम्हाला ठाऊक आहे का?