
छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा अत्यंत आवडीचा विषय. मालिका या प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग झाल्यात. अशात मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. अशीच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालीये. मालिकेचं शूटिंगदेखील सुरू झालंय. ही मालिका आहे स्टार प्रवाहची नवीन मालिका 'कोण होतीस तू काय झालीस तू'. या मालिकेसाठी आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.