Salman Khan : कोण आहे संपत नेहरा ? सलमानच्या घरापासून काहीच अंतरावर राहत होता 'हा' आरोपी

अभिनेता सलमान खानच्या घरावर नजर ठेवणाऱ्या संपत नेहराची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. जाणून घेऊया संपत नेहराविषयी.
Salman Khan
Salman Khan Esakal

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर झालेल्या हल्ल्याबद्दल खळबळजनक खुलासा झालाय. सलमानच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी लॉरेंस बिष्णोईने एका व्यक्तीवर कामगिरी सोपवली होती. या व्यक्तीचं नाव संपत नेहरा असून सलमानच्या घरापासून काहीच अंतरावर त्याने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता.

आता सगळ्यांना प्रश्न पडलाय कि हा संपत नेहरा नक्की आहे कोण? आणि लॉरेंसनेच त्यालाच ही का कामगिरी दिली. या केसमध्ये लॉरेंस आणि अनमोल बिष्णोई मुख्य आरोपी आहे.

कोण आहे संपत मेहरा?

संतोष हा लॉरेंस बिष्णोईच्या खास गुप्तहेरांपैकी एक असून तो मूळचा राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील राजगढमधील कालोडी भागातील रहिवासी आहे. संपतला एकेकाळी अॅथलीट व्हायचं होतं पण तो गुन्हेगारीच्या जगतात अडकला आणि तो गँगस्टर बनला. संपतव्रत आज ३० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, संपत चंदिगढ विद्यापीठात शिकत होता आणि त्याला अॅथलीट व्हायचं होतं. त्याने राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकही त्याने जिंकलं आहे. २०१६ साली त्याच्या मित्रांनी एक गाडी चोरी केली. ती गाडी त्याचे मित्र त्याच्याकडे घेऊन आले आणि या गुन्ह्यांतर्गत पोलिसांनी संपतलाही अटक केली आणि जेलमध्ये पाठवलं. त्यानंतर तो फक्त गुन्हेगारीच्या जगात संत गेला.

Salman Khan
Salman Khan: सलमान खानच्या गाडीवर हल्ल्या करण्याचा बिश्नोई गँगचा मास्टर प्लॅन उघड, पाकिस्तानातून मागवणार होते शस्त्र; चौघांना केली अटक

दरम्यान, सलमान खानच्या अपार्टमेंटच्या बाहेर फायरिंग केल्याप्रकरणी लॉरेंस आणि अनमोल बिष्णोई यांना मुख्य आरोपी करण्यात आलं आहे. त्यांच्याबरोबर गोल्डी ब्रार, रोहित गोदारा, संपत नेहरा, रॉकी शुटर आणि त्यांच्याबरोबर १८ हुन जास्त लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर वरून संपत नेहरा सलमान खानच्या घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका इमारतीत भाड्याने घर घेऊन राहत आणि त्याच्यावर सलमानच्या घराच्या आसपासच्या परिसराची रेकी करण्याची जबाबदारी होती. पण जेव्हा त्याला पोलीस त्याच्या मागावर असल्याची जाणीव झाली तेव्हा तो तिथून पळाला. पण पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या तो त्यांच्या ताब्यात आहे.

Salman Khan
Salman Khan : सलमान नाही तर 'हा' अभिनेता साकारणार होता 'मैंने प्यार किया' सिनेमातील प्रेम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com