

dada kondke
esakal
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असणारे दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटांना वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांचे चित्रपट तब्बल २५- २५ आठवडे थिएटरमध्ये लागलेले असल्याचे. दादांचे चित्रपट आणि सिल्व्हर ज्युबली हे गणित तेव्हा कायमचंच असायचं. त्यांच्या चित्रपटांमुळे हिंदी चित्रपट निर्मात्यांनाही धडकी भरायची. त्यांचे 'सोंगाड्या', 'पांडू हवालदार', 'बोट लावीन तिथे गुदगुल्या' असे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. दादांनी चित्रपटातून प्रचंड पैसे कमावले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्या पैशांचं नेमकं काय झालं?